सकाळी घराच्या खिडकीत उभा होतो तेव्हा समोरच्या झाडावर एक कावळा आणि एक कावळीन त्यांचं घरटं बांधत होते तेव्हा काही विचार आले ते शब्दात मांडत आहे.
एका जगात कावळा आणि कावळीन मोकळ्या आकाशाखाली घर बांधत होते,
दुसऱ्या जगात एक जोडपं आपल्या बंद घराच्या खिडक्याना जाळ्या लावत होते.!
एका जगात कावळा आणि कावळीन मोकळ्या आकाशाखाली घर बांधत होते,
दुसऱ्या जगात एक जोडपं आपल्या नवीन घराच्या सुरक्षा दरवाजाचे डिझाईन ठरवत होते.!
एका जगात कावळा आणि कावळीन मोकळ्या आकाशाखाली घर बांधत होते,
दुसऱ्या जगात एक जोडपं आपल्या बिल्डिंगच्या गेटवर थंब मशीनवर आपला अंगठा पडताळत होते.!
एका जगात कावळा आणि कावळीन मोकळ्या आकाशाखाली घर बांधत होते,
दुसऱ्या जगात एक जोडपं दरवाज्यावर वाजलेल्या बेलनंतर दरवाजाच्या स्क्रीनवर कोण आहे ते बघत होते.!
एका जगात कावळा आणि कावळीन मोकळ्या आकाशाखाली घर बांधत होते,
दुसऱ्या जगात एक जोडपं टेलिफोनवर बिल्डिंगच्या वॉचमनला घरी आलेल्या पाहुण्यांना वरती सोडा असे सांगत होते.!
एका जगात कावळा आणि कावळीन मोकळ्या आकाशाखाली घर बांधत होते,
दुसर जग नक्की मोकळं होत आहे की बाहेरुन बंद आणि आतून मोकळं होत आहे हेच कळत नव्हते.!
दोन्ही तशी भिन्न जग आहेत पण एक संपूर्ण मोकळं तर दुसरं नक्की मोकळं आहे का? हेच एक कोड आहे.