भक्कम .!!
माझ्या आयुष्यातील जोडीदारास, १४ फेब्रुवारी २०१६ रोजी साखरपुड्यापासून सुरू झालेला आपला प्रवास म्हणजेचं एका दशकापूर्वी सुरू झालेला हा प्रवास एक दशकपूर्ती वाटत आहे. ह्या दशकपूर्तीच्या मुहूर्तावर काही ओळी. पहिल्या वर्षाने ओळख दिली ,माझी तुला, तुझी मला. दुसऱ्या वर्षाने आरसा दिला, कधी माझ्यासारखा दिसणारा आणि कधी तुझ्यासारखा. तिसऱ्या वर्षाने जबाबदारी दिली, मी तुला सांभाळण्याची आणि तू …
