आतापर्यंतच्या प्रवासात सावलीसारखी माझ्यापाठी उभी आहेस,कधी खांद्यावर हात ठेऊन, कधी पाठीवरुन हात फिरऊन तर कधी शाब्दिक ओव्याची माळ कानात टोचुन.!! आपल्या नात्यातल्या स्वयंपाकाला माझ्याकडून थोड़ीशी रुचकर फोडणी फक्त तुझ्यासाठी..!!!
माझी सावली..!!
शब्द मी, भावना तू..!!
नात मी, जबाबदारी तू..!!
बाप मी, काळजी तू..!!
फुंकर मी, वादळ तू.!!
प्रश्न मी, उत्तर तू.!!
खडक मी, डोंगर तू.!!
रस्ता मी, प्रवास तू.!!
ढग मी, आकाश तू.!!
फूल मी, मध तू.!!
धग मी, अग्नि तू.!!
उड़ी मी, भरारी तू..!!
धेय्य मी, स्वप्न तू.!!
स्फूर्ति मी, गर्जना तू.!!
रत्न मी, दगिना तू.!!
थेंब मी, पाऊस तू.!!
हवा मी, गारवा तू.!!
श्वास मी, हृदय तू.!!
चूक मी, समज तू.!!
अश्रु मी, खांदा तू.!!
ऊंबरा मी, कळस तू.!!
रचना मी, काव्य तू.!!
हास्य मी, बत्तीशी तू.!!
तुझा मी, माझी सावली तू..!!
एक जादू आहे ह्या कवितेमध्ये, उजवीकडून डावीकडे वाचले तर माझ्या भावना अधोरेखित होतात आणि डावीकडून उजवीकडे तुझ्या.!!