तिच्यासाठी बाबा आणि माझ्यासाठी ती माझी छबी.!!
तिच्यासाठी माझं बडबडणं आणि माझ्यासाठी तिचं न ऐकल्यासारखं करून बागडणं.!!
तिच्यासाठी मायेच कोदंण आणि माझ्यासाठी ती माझा दर्पण.!!
तिच्यासाठी माझे इरसाल नमुने आणि माझ्यासाठी तिच्या नमुन्यांचे उत्तम उदाहरणे.!!
तिच्यासाठी नितांत प्रेम आणि माझ्यासाठी ती माझी भावनिक फ्रेम ..!!
तिच्यासाठी अविरत स्फूर्ति आणि माझ्यासाठी तिची दिवसेंगणिक वाढणारी कीर्ति ..!!
तिच्यासाठी तिचं जग आणि माझ्यासाठी ती माझी जगण्यासाठीची धग..!!
– बाबा.