बाबाला लिहिलेले पत्र.!!

आज वयाची साठी ओलांडत आहेस. ६० वर्षे मागे वळून पाहिले तर काय दिसतं,

संघर्ष, त्याग, जिद्द आणि आभाळएवढं मोठं मन..!!!

संघर्षसुद्धा कधी थांबला नाही तुमच्या मार्गात येताना आणि जेव्हा जेव्हा आला तेव्हा मोठ्या मनाने त्याचा सामना केलास मग ते वयाच्या १२ वर्षी वडिलांचा हरवलेला आधार आणि वेड्या आईची माया घेऊन मुंबईला येऊन दिवसा काम करुन आणि रात्री सगळ जग झोपेत असताना स्वतःच्या स्वप्नासाठी रात्रशाळेत जाणं , न तुझी जिद्द कमी झाली न तुझा आत्मविश्वास..!!!

त्याग आणि तु म्हणजे शर्यतिची सुरुवात अन शेवट, जिथे त्यागाचा शेवट व्हायचा तिथे तुझ्या सुखाची सुरवात आणि जिथे सुखाचा शेवट व्हायचा जिथे त्यागाची सुरवात. मग ती तू मुंबईला असताना तुझ्या खुशालीसाठी आईने पाठवलेली चिट्ठी असुदे किंवा मुंबईहुन ३-४ महिन्याच्या अंतराने होणाऱ्या आपल्या भेटितील मी घातलेली मीठी असो. तू तुझ्या स्वप्नासाठी झटत होतास आणि आम्ही तुझ्यासोबत घालवता येणाऱ्या वेळेसाठी..!!त्यागाने न तुझी पाठ सोडली पण तू मात्र त्याची ढाल करत एक एक शर्यत जिंकत गेलास..!!!

ज़िद्द म्हणजे तुझ्याकडे असलेली एक पर्वणीच,
ह्या जिद्दीनेच तुला तारले आणि सावरले, मग ते एका खेड़ेगावातुन येऊन मुंबईमधे व्यवसाय सुरु करणे असु दे किंवा यशोधरेच्या शिखरावर असताना तुझ्या मौलिक आणि मानसिक आधारस्थम्बाचे जाणे असो, होय तू क्षणिक डगमगलास पण तुझ्या जिद्दीने नेहमीच तुला पुन्हा शिखरावर जाण्यासाठी ऊर्जा दिली..!!!

आभाळ कमी पडेल पण माझ्या बाबाचे मन कधीच उण नाही पडणार. समाजकारण असु दे वा राजकारण, लोक त्यांना ओळखतात ती त्यांच्या मोठेमनी वृत्तिमुळे, एक वेळेस ते दोन घास कमी खातील पण त्यांच्या प्रत्ययात आलेल्या व्यक्तीला दोन घास जास्तच देतील मग ते घास अनुभवाचे असतील अथवा नवीन ऊर्जेचे असतील अथवा द्य्यानाचे असतील अथवा मदतीचे..!!!

बाबा तू आजपर्यंत कमवलेली संपत्ती म्हणजे जनमाणसामधील तुझी असलेली उदार, संयमी, प्रामाणिक आणि उदारमतवादी प्रतिमा तसेच त्यांनी दिलेले भरभरून प्रेम. हेच तुझ्या पुढील वाटचालीचे पाया असतील..!!

उदया तुला यशश्वी झालेले पाहुन दोनच गोष्टी दिसतील तुला तिथुन, कडकडुन टाळ्या आणि आनंदाश्रु..!!!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *