देवमाणूस..!!!
माझ्या आयुष्यातील बाबा नावाचे पर्व संपले. माझ्या बाबाने १ डिसेंबरला अचानक जगाचा निरोप घेतला.. माझ्या वयाची पहिली ७ वर्षे मी गावी आई आणि आजीसोबत घालवली. बाबा मुंबईला कामाला होता म्हणून बाबाची आणि माझी भेट जेमतेम ६ महिन्यातून एकदा होत असे. मी गावात कोणत्यातरी कोपऱ्यात खेळत असायचो आणि मला निरोप यायचा की तुझे बाबा आले आणि …
