तस तुझ आणि माझ नातं त्या टिव्हीच्या स्क्रीन एवढंच.!!
तस तुझ आणि माझ नातं तू केलेल्या चित्रपटांपेक्षा तू सहजतेने बोललेल्या डायलॉगमधल्या भावनांएवढंच..!!
तस तुझ आणि माझ नातं तू गाठलेल्या उंचीपेक्षा तू शून्य असताना तुझ्या असलेल्या परिस्थिति एवढंच..!!
तस तुझ आणि माझ नातं तू जगभरात केलेल्या भूमिकांपेक्षा तू मिरवलेल्या आणि तुझ्यात असलेल्या भारतीयाएवढंच..!!
तस तुझ आणि माझ नातं तुला ग्रासलेल्या व्याधिपेक्षा त्याचा सामना करण्यासाठी मनाशी धरून ठेवलेल्या सकारात्मक विचाराएवढंच.!!
तस तुझ आणि माझ नातं आईसोबत घालवलेल्या आनंदाच्या क्षणापेक्षा तिच्या शेवटच्या क्षणी सोबत नाही ह्या खंतेएवढंच.!!
तस तुझ आणि माझ नातं मित्रांनी केलेल्या परोपकारपेक्षा ते संकटात असताना एकाही क्षणाचा विलंब न लावता घेतलेल्या धावेएवढंच.!!
तस तुझ आणि माझ नातं मृत्यु समोर दिसत असताना देखील “माझी वाट बघा” ह्या तुझ्या हाकेने दिलेल्या आशेएवढंच ..!!!
तुझी “अंग्रेजी मीडियम” मधली बापाची भूमिका माझ्यातल्या बापाला भावुन गेली म्हणून वरील लेख तुझ्या कार्याला सलाम..!!!
तुझा एक चाहता!!