काल संध्याकाळी एक बाईकस्वरांचा ग्रुप भगवा झेंडा बाईकला बांधून निघाले होते तेव्हा आठवले की उद्या शिवजयंती आहे. तेव्हा मी स्वतःला म्हटले की नक्की शिवजयंती म्हणजे काय? डोळे बंद केले आणि ज्या ज्या आठवणी डोळ्यासमोर आल्या त्या शब्दलिखित केल्या.
शिवजयंती म्हणजे
लहानपणी महाराजांच्या पालखी सोहळ्यात पाहिलेला आकाशात झेपावणारा भगवा, एकमेकांवर उधळलेला गुलाल आणि लेझिम व ढोला वरती धरलेला ताल!!
शिवजयंती म्हणजे
शाळेत असताना ऐकेलेली पावनखिंडेची गोष्ट आणि पावनखिंड लढ्वत असताना धारातिर्थी पडलेला माझा बाजीप्रभू देशपांडे.!
शिवजयंती म्हणजे
रस्त्यावरून चालत जात असताना मंडपाच्या स्पीकर मधून शाहिरांच्या कणखर आवाजाने आग ओकत असलेला महाराजांचा उस्फुर्त पोवाडा आणि त्याच्या ऊर्जेने आलेला अंगावरील काटा!!
शिवजयंती म्हणजे,
इतिहासाच्या पुस्तकात वाचलेला मिर्झाराजे आणि महाराज यांचा पुरंदरचा तह ज्यात स्वतःच्या हिमतीवर उभ केलेलं किल्ल्यांचे साम्राज्य महाराजांनी देऊ केले आणि परत तेच साम्राज्य सगळ्या परिस्थितीवर मात करून पुन्हा मिळवले.!!
शिवजयंती म्हणजे,
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ याचं मूर्तीमंत उदाहरण देणारा अफजलखानाच्या वधाचा संग्राम आणि मृत्युनंतर संपलेले वैर बाजूला ठेऊन त्याच अफजलखानाची कबर बांधून त्यासाठी केलेली दिवा बत्तीची सोय.!!
शिवजयंती म्हणजे,
निस्वार्थी, निर्भीड, नेक, निष्णात व निष्ठावंत मावळ्यांची खोलवर पसरलेली खोरी आणि आपल्या राजासाठी स्वखुशीने मरून व मारून सह्याद्रीच्या छातीवर स्वराज्यासाठी लढणारी मावळ्यांची अविरत नदी. !!
शिवजयंती म्हणजे,
दादोजी कोंडदेव, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, जीवा महाला, कोंडाजी फर्जंद, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, शिवा काशीद, हिरोजी इंदलकर आणि अश्या अनेक मावळ्यांच्या पराक्रमाच्या गाथा.!!
शिवजयंती म्हणजे,
प्रतापगडावर फडफडणारा भगवा,
रायगडच्या पायथ्याशी पाचाड गावात विसावलेल्या स्वराज्याच्या संकल्पनेची भावना,
भीमा नदीच्या तीरावर स्वराज्याच्या रक्षणासाठी सोसलेल्या अमर्याद वेदना,
३५० शे वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर प्रत्येक लहान मुलाच्या तोंडून आपसूकच उडणारी “जय” नावाची घोषणा.!!
Eyatta 4 cha purn ithihas pustak Ani badlat chalaleli shiv jayanti swrup uttam madles
Eyatta 4 thi cha ithihas pustak ka til sampurn itihas Ani badlat janari shiv jayanti swrup uttam shabdat madles