बदलत्या काळानुसार आता घरातल्या गृहिणीची भूमिका पण बदलली आहे. ही गृहिणी आता स्वतःच करियर करून घर सांभाळण्याची किमया करत आहे. स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या ह्या प्रवासात कधी निराशा येते, कधी दडपण येते, कधी आनंद होतो, कधी दुःख समोर उभे राहते तर कधी कधी तर स्वतःची ओळख विसरावी लागते. ह्या प्रत्येक नव्या दम्याच्या गृहिणीसाठी खाली दिलेली चार ओळींची प्रेरिक फुंकर.
तू नको थमऊ तुझ्या अपरिचित कर्तुत्वाला फक्त संसाराच्या कोशात.
तू नको थमऊ तुझ्या गाडलेल्या स्वप्नांना फक्त लोकांनी दिलेल्या मतात.
तू नको थमऊ तुझ्या अगणित ईच्छाना फक्त दुसऱ्याच्या खांद्यात.
तू नको थमऊ तुझ्या अविरत परिश्रमाना फक्त घराच्या चार चौकटीत.
तू नको थमऊ तुझ्या लुप्त कलांना फक्त तुझ्या मनाच्या कोपऱ्यात.
तू नको थमऊ तुझ्या ज्ञान आणि अनुभवाच्या समुद्राला फक्त शंकारुपी किनाऱ्यात.
तू नको थमऊ तुझ्या मनाला फक्त आणि फक्त चार ओळ्यात, मोकळी हो आणि घे उंच भरारी नव्या दम्यात.
तू नको थमऊ ह्या नव्या दम्याच्या गृहिणीला फक्त आणि फक्त इंद्रधनुष्याच्या सात रंगात,
उधळू दे नवनवीन रंगाचे भिन्न रंग एका कर्मरुपी चित्रात..!!
नक्की शेअर करा तुमच्या ओळखीच्या नवीन गृहिणीला.!!
– अमित कोबनाक