माझ्या आयुष्यातील जोडीदारास,
१४ फेब्रुवारी २०१६ रोजी साखरपुड्यापासून सुरू झालेला आपला प्रवास म्हणजेचं एका दशकापूर्वी सुरू झालेला हा प्रवास एक दशकपूर्ती वाटत आहे. ह्या दशकपूर्तीच्या मुहूर्तावर काही ओळी.
पहिल्या वर्षाने ओळख दिली ,माझी तुला, तुझी मला.
दुसऱ्या वर्षाने आरसा दिला, कधी माझ्यासारखा दिसणारा आणि कधी तुझ्यासारखा.
तिसऱ्या वर्षाने जबाबदारी दिली, मी तुला सांभाळण्याची आणि तू मला सांभाळण्याची.
चौथ्या वर्षाने आठवणी दिल्या, काही मी गोंजारण्यासारख्या आणि काही तू साठवण्यासारख्या.
पाचव्या वर्षाने प्रगती दिली, थोडी माझी होत होती आणि थोडी तुझी होत होती.
सहाव्या वर्षाने त्रागा दिला, थोडा तुझ्या वाटेला आणि थोडा माझ्या वाटेला.
सातव्या वर्षाने संयम दिला, कधी तुझा सुटला आणि कधी मी राखला.
आठव्या वर्षाने धीर दिला, कधी तू धीराने घेतले तरी कधी मी.
नवव्या वर्षाने आधार दिला, कळवत नकळत कधी तू माझ्या पाठी उभी राहिलीस आणि कधी मी.
दहाव्या वर्षाने नवीन ऊर्जा दिली, काही मी तुझ्यासाठी करण्याची तर काही तू माझ्यासाठी करण्याची.
ह्या दशकपूर्तीने एक गोष्ट नक्की केली ती म्हणजे तुझी आणि माझ्यातली भक्कमता.
तुझी माझी साथ अशीच राहू दे, आज दशक झाले आहे उद्या दशकांचे शतक होऊ दे.
तुझा,
अमित.!!!
