अरे इरफाना..!!

तस तुझ आणि माझ नातं त्या टिव्हीच्या स्क्रीन एवढंच.!! तस तुझ आणि माझ नातं तू केलेल्या चित्रपटांपेक्षा तू सहजतेने बोललेल्या डायलॉगमधल्या भावनांएवढंच..!! तस तुझ आणि माझ नातं तू गाठलेल्या उंचीपेक्षा तू शून्य असताना तुझ्या असलेल्या परिस्थिति एवढंच..!! तस तुझ आणि माझ नातं तू जगभरात केलेल्या भूमिकांपेक्षा तू मिरवलेल्या आणि तुझ्यात असलेल्या भारतीयाएवढंच..!! तस तुझ आणि …

बाप-लेक

तिच्यासाठी बाबा आणि माझ्यासाठी ती माझी छबी.!! तिच्यासाठी माझं बडबडणं आणि माझ्यासाठी तिचं न ऐकल्यासारखं करून बागडणं.!! तिच्यासाठी मायेच कोदंण आणि माझ्यासाठी ती माझा दर्पण.!! तिच्यासाठी माझे इरसाल नमुने आणि माझ्यासाठी तिच्या  नमुन्यांचे उत्तम उदाहरणे.!! तिच्यासाठी नितांत प्रेम आणि माझ्यासाठी ती माझी भावनिक फ्रेम ..!! तिच्यासाठी अविरत स्फूर्ति आणि माझ्यासाठी तिची दिवसेंगणिक वाढणारी कीर्ति ..!! …

बाबाला लिहिलेले पत्र.!!

आज वयाची साठी ओलांडत आहेस. ६० वर्षे मागे वळून पाहिले तर काय दिसतं, संघर्ष, त्याग, जिद्द आणि आभाळएवढं मोठं मन..!!! संघर्षसुद्धा कधी थांबला नाही तुमच्या मार्गात येताना आणि जेव्हा जेव्हा आला तेव्हा मोठ्या मनाने त्याचा सामना केलास मग ते वयाच्या १२ वर्षी वडिलांचा हरवलेला आधार आणि वेड्या आईची माया घेऊन मुंबईला येऊन दिवसा काम करुन …