शिवजयंती.!!!
काल संध्याकाळी एक बाईकस्वरांचा ग्रुप भगवा झेंडा बाईकला बांधून निघाले होते तेव्हा आठवले की उद्या शिवजयंती आहे. तेव्हा मी स्वतःला म्हटले की नक्की शिवजयंती म्हणजे काय? डोळे बंद केले आणि ज्या ज्या आठवणी डोळ्यासमोर आल्या त्या शब्दलिखित केल्या. शिवजयंती म्हणजे लहानपणी महाराजांच्या पालखी सोहळ्यात पाहिलेला आकाशात झेपावणारा भगवा, एकमेकांवर उधळलेला गुलाल आणि लेझिम व ढोला …
