गणित चुकायला लागले आहे..!!

प्रवास सुरू केला तेव्हा खूप काही करायचं होते,प्रवासाने मध्यस्थ गाठल्यासारख वाटत आहे पण खूप काही करायचे राहिले असे वाटते,अनुभवाची बेरीज होत आहे, आशेची वजाबाकी होत आहे, कुठेतरी गणित चुकायला लागले आहे.!! प्रवास सुरू केला तेव्हा सगळ्यांना आनंदी ठेवायचं होते,प्रवासात पुढे जाताना कळले की सगळ्यांना आनंदी ठेवायच्या गडबडीत स्वतःचा आनंद हरवला आहे असे वाटते,अनुभवाची बेरीज होत …

आम्ही संघर्ष पुरुष.!!

आम्ही संघर्ष पुरुष.!! नुकताच आपण टी २० विश्वचषक जिंकला आणि भारत विश्वविजेता झाला. विश्वविजेता होण्याचा खूप वर्षांचा दुष्काळ अखेर संपला. विश्वचषक जिंकल्यानंतर प्रत्येक खेळाडूला आप-आपल्या भावना अनावर झाल्या आणि खूप वर्षांनी प्रत्येक संघर्षमयी पुरुषाला आनंददायी अश्रुंनी रडताना बघितले, काही मैदानावर रडत होते, काही स्टेडियम मध्ये रडत होते तर काही टीव्ही च्या स्क्रीन समोर बसून रडत …

म – मराठीचा.!!

माझं आणि माझ्या बायकोचं आधीच ठरलं होते की आम्ही आमच्या मुलीला मातृभाषेतूनच शिक्षण द्यायचे. त्यासाठी आम्ही एकच मराठी शाळेचा फॉर्म भरला आणि तिथे प्रवेश घेतला. आज माझी मुलगी पहिली ला आहे. सुरुवातीपासून आम्ही तिला भिन्न आणि विविध गोष्टींचा अनुभव द्यायचा प्रयत्न केला. कधी मराठी नाटके बघितली, कधी मराठी सिनेमे बघितले, कधी गडावर घेऊन गेलो तर …

चुका..!!!

आपण एकतर माणूस म्हणून चुकतो किंवा समोरच्याच काय चुकलं आहे हे पाहत असतो पण चुका होणे हे साहजिकच असते. एक साधस अवलोकन आहे, आपले वर्तमान आयुष्य हे आपल्या मागील चार पिढ्यांनी चुकत – चुकत केलेल्या चुकांमुळे घडलेलं एक बरोबर होत गेलेले आयुष्य आहे.आपल्या एका पिढीने शिस्त आणि संस्कार एकत्र ठेवण्याची व्यवस्था केली, दुसऱ्या पिढीने घराची …

दे-घे

१०.१३ ची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पकडली आणि नेमकी बसायला जागा मिळाली. हळूहळू गर्दी वाढली आणि काही वेळाने एक परिवार बच्चे कंपनी सोबत ट्रेन मध्ये चढला सोबत काही महिला पण होत्या. गर्दीतील महिलांची कसरत पाहता मी माझी सीट एका महिलेला दिली. आश्चर्यकारकरित्या पुढील काही वेळात मला बसायला विंडो सीट मिळाली तेव्हा एक विचार मनात येऊन …

गाव – शहर (गोष्ट दोन जिवलग मित्रांची).

जर तुम्ही काही वर्षांपूर्वी तुमचं गाव सोडून शहरात राहायला आला असेल तर ही गोष्ट नक्कीच तुम्हाला आवडेल. ही गोष्ट आहे एका शांत गावाची आणि चंचल शहराची. एक भलं मोठं जंगल होत त्यात दोन जिवलग मित्र राहत होते. एकाचे नाव होते गाव आणि दुसऱ्याचे नाव होते शहर. गावाचा स्वभाव एकदम शांत, समाधानी होता आणि त्याउलट शहराचा …

तू

बदलत्या काळानुसार आता घरातल्या गृहिणीची भूमिका पण बदलली आहे. ही गृहिणी आता स्वतःच करियर करून घर सांभाळण्याची किमया करत आहे. स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या ह्या प्रवासात कधी निराशा येते, कधी दडपण येते, कधी आनंद होतो, कधी दुःख समोर उभे राहते तर कधी कधी तर स्वतःची ओळख विसरावी लागते. ह्या प्रत्येक नव्या दम्याच्या गृहिणीसाठी खाली …

राखणदार.!!

माझा लहापणापासूनच खूप सारा वेळ गावात, जंगलात , नदीत आणि आजूबाजूच्या परिसरात घालवल्यामुळे गावाकडची ओढ आणि आपुलकी खूप तीव्र आहे. गावाकडचा हा निसर्ग असाच राहील का? हा प्रश्न नेहमीच पडायचा आणि जसं जसं गावातून मुंबई मध्ये आलो, काही वर्षांनी गावातील बहुतांश लोकं मुंबई मध्ये स्थायिक होऊ लागली, गावे ओस पडू लागली तेव्हा हा प्रश्न अजूनच …

शिवजयंती.!!!

काल संध्याकाळी एक बाईकस्वरांचा ग्रुप भगवा झेंडा बाईकला बांधून निघाले होते तेव्हा आठवले की उद्या शिवजयंती आहे. तेव्हा मी स्वतःला म्हटले की नक्की शिवजयंती म्हणजे काय? डोळे बंद केले आणि ज्या ज्या आठवणी डोळ्यासमोर आल्या त्या शब्दलिखित केल्या. शिवजयंती म्हणजे लहानपणी महाराजांच्या पालखी सोहळ्यात पाहिलेला आकाशात झेपावणारा भगवा, एकमेकांवर उधळलेला गुलाल आणि लेझिम व ढोला …

दोन जग.!!

सकाळी घराच्या खिडकीत उभा होतो तेव्हा समोरच्या झाडावर एक कावळा आणि एक कावळीन त्यांचं घरटं बांधत होते तेव्हा काही विचार आले ते शब्दात मांडत आहे. एका जगात कावळा आणि कावळीन मोकळ्या आकाशाखाली घर बांधत होते, दुसऱ्या जगात एक जोडपं आपल्या बंद घराच्या खिडक्याना जाळ्या लावत होते.! एका जगात कावळा आणि कावळीन मोकळ्या आकाशाखाली घर बांधत …